केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तीच्यावर अंडी, शाईफेक केली.

Spread the love

ठाणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान कळंबोली पोलिस स्टेशनच्या बाहेर तिच्यावर अंडी आणि शाईफेक करण्यात आली आहे. तीला ठाणे पोलिस ताब्यात घेत असताना हा प्रकार घडला असून केतकीला पोलिसांनी अटक केली आहे.

शरद पवार यांच्यावर टीका करत तीने एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान ठाणे पोलिस तीला ताब्यात घेत असतानाच तिच्यावर अंडे आणि शाई फेकण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘केतकी हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

राष्ट्रवादींच्या महिला कार्यकर्त्यांकडून अंडी आणि शाईफेक करण्यात आली आहे. ही घटना ठाण्याच्या कळंबोली पोलिस ठाण्याच्या बाहेर घडली आहे. दरम्यान तीच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वर्तुळातून तिच्यावर टीका झाली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केतकीवर टीका केली आहे.

या प्रकरणानंतर केतकी चितळेवर मुंबई पुण्यासह तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून ठाणे पोलिसांनी केतकीला अटक केली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून पोलिस ताब्यात घेत असताना केतकी चितळेवर अंडी आणि शाई फेकण्यात आली आहे.

केतकी चितळे हिने संतांच्या अभंगाचा आधार घेत शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह मजकुर लिहिला होता. शनिवारी सकाळपासूनच ही पोस्ट मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाली होती. दरम्यान, पवार यांच्यावर झालेल्या टिकेमुळे पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही समाजमाध्यमांवर केतकीविरुद्ध मोठ्या प्रमाणात टिकेची झोड उठवली होती. त्यानंतर सायबर पोलिसांत तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टीम झुंजार