झुंजार । प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंदनगर : (ता . इंदापूर) कळंब गावचे सुपुत्र मेजर गौतम शशिकांत वीर हे भारतीय सैन्य दलातुन १२ महार रेजिमेंट मधून १७ वर्षे भारतमातेची सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा श्री छत्रपती राजे माजी सैनिक संघ वालचंदनगर यांचे वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जवान गौतम वीर यांची वालचंद नगर जुने बस स्टँड, पोलीस चौकी येथून ते गार्डन चौक अशी अश्व वरून सवाद्य सह फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय वंदे मातरम् च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ठीक ठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. या स्वागताने जवान गौतम वीर हेही भारावून गेले. ‘ मातृभूमीची सेवा करुन परतलो आहे. नोकरीची सेवापुर्ती झाली असली तरी देश सेवा अंतिम श्वासापर्यंत सुरूच राहील; अशी प्रतिक्रिया जवान गौतम वीर यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी श्री छत्रपती राजे माजी सैनिक संघ चे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्यांनी जवान गौतम वीर यांचा शाल, श्रीफळ,फेटा, पुष्पहार देवून भव्य असा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच वालचंदनगर पोलिस स्टेशनचेASI रतिलाल चौधर यांनी जवान वीर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अनेक आजी-माजी सैनिकांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यात त्यांनी सैनिकांच्या योगदानाबद्दल तसेच त्यागाबद्दल भाषणातून माहिती दिली. तरुणांनी लष्करी सेवा स्वीकारण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.यावेळी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय हिंद संघटना इंदापूर, त्रिदल संघटना नातेपुते, पंढरीनाथ बोंद्रे, डी. एच निंबाळकर,
सुनील लोणकर, महेंद्र चव्हाण, नवनाथ बोंद्रे, सदाशिव थोरात, शिवाजी काळे, भरत गवळी, महादेव माने, औदुंबर नरुळे, मारुती सुतार, कळंब गावचे सरपंच सौ. विद्याताई सावंत , पत्रकार संतोष कदम, विक्रम पिंगळे,तसेच पंचक्रोशीतील जनसमुदाय बहुसंख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विक्रम जगताप यांनी मानले.