
झुंजार प्रतिनिधी । दिपक प्रजापती
अमळनेर :- शहरातील श्री भद्रा ग्रुप चे प्रताप छबुलाल साळी यांनी त्यांचे सुपुत्र अक्षय उर्फ मॉन्टी प्रताप साळी युवा उद्योजक याच्या वाढदिवसाचे दिवशी रक्तदान सारखे श्रेष्ठदान त्यांनी करून डॉक्टर मनीषा पाटील यांच्या दवाखान्यात ॲडमिट असलेल्या
गरीब कुटुंबातील शिवानी पारधी या महिलेला रक्ताची अत्यंत गरज असल्याचे प्रताप साळी यांना मनोज शिंगणे कडून माहिती पडल्यावर तात्काळ विलंब न करता रक्तदान पेढी स्वतः जाऊन रक्तदान करून पुत्राच्या वाढदिवसा ला रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला सदैव समाजकार्यात गोरगरिबांच्या सेवेसाठी सतत कार्यरत असणाऱ्या साळीपरिवार तथा श्री भद्रा प्रतीक ग्रुप सदैव अग्रेसर असून समाजापुढे या कार्याचा आदर्श ठरेल
सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे व मित्रपरिवार यांनी मुलाच्या वाढदिवसाला वडिलांनी केलेल्या रक्तदानाच्या उत्कृष्ट कार्याचे अभिनंदन करत मोन्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.