झुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- जळगाव येथे खाजगी काम आटोपून म्हसावदमार्गे घरी जात असताना उमर्दे गावाजवळील खदाणी जवळ अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे दुचाकीवर मागे बसलेला 24 वर्षीय युवकाच्या तोल गेल्यामुळे दुचाकी स्लिप झाल्याने डोक्यास व पाठीला जबर मार लागल्यामुळे एरंडोल येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना पंकज एकनाथ पाटील वय 24 वर्षे रा. मराठखेडा ता. पारोळा या युवकांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दि. १५/०५/२०२२ रोजी ०७.०० वाजेचे सुमारास नगराज भरत पाटील व त्याच्या भाचा पंकज एकनाथ पाटील यास जळगाव येथे खाजगी काम असल्याने ते पंकज याची MH-19-DX-4867 या क्रमांकाची मोटारसायकलने जळगाव येथे गेले. काम आटोपल्यानंतर 10:45 वाजेचे सुमारास मामा नागराज पाटील व पंकज जळगाव येथुन म्हसावद मार्गे मराठखेडा येथे जाण्यास निघालो त्यावेळी दुचाकी नगराज पाटील हे चालवीत होते व पंकज हा दुचाकीवर मागे बसलेला होता.
उमरदे गावाजवळ अचानक समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने मोटारयाकलचा तोल जावुन स्लीप झाल्याने घसरत जावुन पंकज हा डांबरी रोडावर फेकला गेला तसेच एकनाथ पाटील हा रोडाच्या खाली मातीत फेकलो गेलो. पंकज यास डोक्यास तसेच पाठीवर मार लागलेला होता. त्यानंतर लागलीच रोडाने एक रिक्षा आली ती रिक्षा थांबवून पंकज यास एरंडोल येथिल कल्पना हॉस्पीटल एरंडोल येथे घेवून आलेत तेथील डॉक्टरांनी पंकज याचेवर उपचार सुरु केला. उपचारा दरम्यान पंकज यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले
याबाबत एरंडोल पोलीस स्थानकात नागराज भरत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हवलदार रवींद्र तायडे हे पुढील तपास करीत आहे.