मेष : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ : जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारीतील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
तूळ : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
मकर : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.
कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायात चांगली स्थिती राहील.
मीन : गुरुकृपा लाभेल. शत्रुपीडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.