मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल ; या जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

Spread the love

ज्या मान्सूनची वाट शेतकरी दरवर्षी पाहत असतो तो मान्सून आज 16 मे रोजी अंदमानच्या समुद्रात दाखल झाला असल्याने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून केरळमध्ये 27 मेपर्यंत पोहोचेल. त्यामुळे पावसासाठी महाराष्ट्र, केरळ, तामिनाडू, अंदमान-निकोबारमध्ये पोषक हवामान तयार होत असल्याचे आनंदायी वृत्त आहे

महाराष्ट्रातील अनेक भागांत ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय विदर्भामध्येही ढगाळ वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट….
आज मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर तर मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, परभणी व नांदेड या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच या भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

नैऋत्य मान्सून द.बंगालच्या उपसागराच्या काही भागात,अंदमान निकोबार बेटांचा बहुतांश भाग व‌‌ अंदमान समुद्रात आज 16 मे रोजी पुढे सरकला
पुढील 4-5 दिवसांत केरळ किनारपट्टी व द.आतील कर्नाटक,आसाम,मेघालय व अरुणाचल प्रदेशात isol मुसळधार-अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता IMD कडून वर्तविण्यात आली आहे.

टीम झुंजार