पळासखेडे बु विकासोवर शिवसेनेचा भगवा…
१२ पैकी१२ जागांवर सेनेचा बिनविरोध विजय

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
पारोळा –
तालुक्यातील पळासखेडे बु विविध कार्यकारी सोसायटीची निवणडुक ११ एप्रिल रोजी पार पडली. या निवडणुकीत १२ जागेसाठी मतदान प्रक्रीया घेण्यात आली. १२ अर्जांच्या विरोधात एकही अर्ज प्राप्त न झाल्याने पळासखेडे बु विकासोवर शिवसेनेने १२ पैकी १२ जागांवर बिनविरोध विजय मिळवत भगवा फडकविला आहे.

चेअरमन साहेबराव आत्माराम पाटील, दिलीप हिंम्मतराव पाटील, दिलीप काशिराम पाटील, संतोष सखाराम पाटील, सुभाष गुलाब पाटील, रतन बुधा पाटील, धनराज ताराचंद पाटील, युवराज शेनपडु शिंदे, राजेंद्र चिंतामण पाटील, भालचंद्र सिताराम पाटील, आनंदा सुकदेव पाटील, प्रकाश केशवलाल मारवाडी अशी विजयी उमेदवारांची नावे आहे.

या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा देत अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संजय गांधी निराधार समिती सदस्य सुभाषआबा पाटील, पंकज मराठे, करमाड सरपंच भैय्या पाटील, श्रावण चौधरी यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

टीम झुंजार