झुंजार । प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंदनगर : (ता. इंदापूर) शांतीसुर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरी आयोजित, जगाला शांतीचा संदेश देणारे विश्व शांतिदूत तथागत गौतम बुद्ध यांचा २५६६ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळेस मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील महिला, नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता समता ज्योत दौड चे भव्यदिव्य स्वागत करून झाली. प्रसंगी महिलांनी दौड मध्ये सहभागी झालेल्या सर्व युवकांवर ती पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले.
प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक त्रिशरण, पंचशील, बुद्ध पूजा संपन्न झाली. यावेळेस सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (मामा) यांच्या हस्ते ‘आय लव संविधान’ या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. अहिंसा आणि शांतीचे उपासक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारात सकल मानवजातीच्या कल्याणाची शक्ती असल्याचे प्रतिपादन भरणे यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. अरुण कांबळे (उपप्राचार्य विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब), बाळासाहेब सर्वगोड (प्राचार्य वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब), राहुल वाघमारे सर (श्री. फत्तेचंद जैन जु. कॉलेज, चिंचवड), सौ. बायडाबाई शिवशरण (ग्रा. स. रणगाव), योगेश करे (ग्रामसेवक रणगाव ग्रामपंचायत), शिवाजी केंगार सर, डॉ. बाबासाहेब कांबळे (MD Med.), हर्षवर्धन गायकवाड (ग्रा. स. वालचंदनगर), जय फडतरे (युवा उद्योजक), बबलू पवार उपस्थित होते.
शांती सूर्य सोशल फाउंडेशन च्या वतीने सायंकाळी ६ वाजता खीर दान ( अन्नदानाचा) कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळेस शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप प्रा. डॉ. अरुण कांबळे सर व बाळासाहेब सर्वगोड सर यांच्या हस्ते करण्यात आले.
बुद्ध जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांती सूर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरी तसेच उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.