एक हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात .

Spread the love
राजेंद्र भास्करराव पाटील

जळगाव : लाचलुचपत विभागाच्या कारवाईने जळगावत मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या बारावीच्या निकालाचे प्रमाणपत्र आणि बोर्ड सर्टीफिकेटवर आईचे नाव दुरूस्ती करण्याच्या मोबदल्यात १ हजाराची लाच घेताना वडगाव येथील कविवर्य श्री.ना.धो.महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक जळगाव लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. राजेंद्र भास्करराव पाटील, वय-55 (रा.भगवती हौसिंग सोसायटी,मालेगाव नाक्याजवळ, चाळीसगाव) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, तक्रारदार यांचा मुलगा हा कविवर्य श्री.ना.धो.महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,वडगाव ता.सोयगाव जि.औरंगाबाद येथुन सन-२०२१ मध्ये इयत्ता-१२ वी या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झालेला होता. सदर निकालाचे प्रमाणपत्र व बोर्ड सर्टीफिकेट वरती मुलाच्या आईचे नाव चुकीचे असल्याने सदर दोन्ही प्रमाणपत्रांवरील नाव दुरुस्ती करून आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष 1,000/-रुपये लाचेची मागणी केली.

त्यानुसार अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP. शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी सापळा रचून लाच घेताना मुख्याध्यापक याला अटक केली आहे.

टीम झुंजार