नैराश्यात जीवन जगणाऱ्या इसमाचा पारोळ्यात खून

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । पारोळा
एरंडोल तालुक्यातील रवंजे येथील तीलकचंद डांगी यांच्या पत्नी घर सोडून निघून गेल्याने त्यांनी देखील पत्नी विरहात घर सोडुन नैराश्यात जीवन जगत होते.१६ मे रोजी रात्री ३ वाजता एका इसमाने डोक्यावर हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या इसमाचा १७ रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली.

एरंडोल तालुक्यातील रवंजे येथील तीलकचंद मांगीलाल डांगी ३५ यांची पत्नी घर सोडून निघून गेल्याने डांगी यांनी देखील घर सोडले याबाबत २९ एप्रिल रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती.त्या दिवसापासून आजतागायत डांगी मिसिंग होते.

दरम्यान पारोळा बस्थानाकात १६ मे रोजी रात्री झोपलेले असतांना काही त्रास जाणवू लागल्याने आरडाओरडा करीत होते.परंतु तेथेच झोपलेले कमलेश नाना मिस्तरी (रा.पाठक गल्ली पारोळा) यांना आवाज सहन न झाल्याने डांगी यांना आवाज बंद करण्याचे सांगितले मात्र आवाज बंद न केल्याने झोपमोड झालेले पाठक यांनी क्रोधात डांगी यांना कचरा कुंडी डोक्यात मारल्याने डांगी जखमी झाले.

डांगी यांना पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलिसांना माहिती कळताच पोलिसांना कुटीर रुग्णालयात दाखल केले तेथून जळगाव येथे रवाना करण्यात आले मात्र उपचारादरम्यान डांगी यांचा मृत्यू झाला याबाबत पोलिसात कमलेश मिस्टरी यांचा विरुद्ध ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल।करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.

टीम झुंजार