जळगाव प्रतिनिधि:- सार्वे बु प्र लो. ता पाचोरा येथील ग्राम पंचायतीचे सरपंच श्रीमती भागाबाई बळीराम पाटील यांनी मालकी हक्का चे जागे पेक्षा जादा जागेवर अतिक्रमण करून सरकारी व सार्वजनिक जागेवर राहते घराचे बांधकाम केल्यामुळे त्यांना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे म्हणून श्री नारायण दोधु बोरसे यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता.
त्यावर चौकशी होऊन शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण करून जादा जागेवर घराचे बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यामुळे,जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांनी श्रीमती पाटील यांना सरपंच व सदस्य पदावरुन दिनांक 5. 5.2022 रोजी अपात्र ठरविले आहे. या बाबत सर्विस्तर वॄत असे कि सार्वे बु।। प्र लो येथील सरपंच श्रीमती भागाबाई बळीराम पाटील यांची खाजगी मालमत्ता क्र 91तिचे क्षेत्रफळ 322. इतके असतांना त्यांनी सुमारे 1095 चैl फुट एवढ्या सरकारी व सार्वजनिक जमिनीवर विना परवानगी अतिक्रमण करुण राहत्या घराचे बांधकाम केल्यामुळे व एकत्र कुटुंब सह लाभ घेत असल्यामुळे त्यांना सदस्य व सरपंच पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून
श्री नगराज दोधु बोरसे यांनी ग्रा. प. अधिनियम 1958 चे कलम 14.जे- 3 प्रमाणे जिल्हाधिकारी यांचे कडे विवाद अर्ज क्र-47/ 021.ने तक्रार दाखल केली असता त्यावर कायदेशीर सुनावणी होऊन सरपंच यांनी शासकीय व सार्वजनिक जमिनीवर शासनाची कायदेशीर पणे परवानगी न घेता अनधिकृत व बेकायदेशीर पणे मालकी हक्काचे जागे पेक्षा जादा जागा मिळकत ताब्यात ठेवून त्यावर राहते घराचे बांधकाम केले आहे.
तरी सरपंच यांनी स्वत:शासकीय व सार्वजनिक जागेवर अतिक्रमन केल्याचे सिद्ध झाल्यामुळे. जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी श्रीमती भागाबाई बळीराम पाटील. यांना ग्रा.प.सरपंच व सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे.या निकाला मुळे ग्रामस्थांन म्हधे समाधानाचे वातावरण तयार झाले असुन. जिह्यातील ग्राम पंचायत पदाधिकारी यांचेत खळबळ उडाली आहे. तक्ररदार श्री नगराज पाटील यांचे वतीने अँड. विश्वासराव भोसले.(पिंपरखेडकर) यांनी काम पाहिले. या निकाला कडे तालुक्याचे लक्ष्य लागुण होते.