नेरुळ (नवि मुंबई): – सध्या लैंगिक अत्याचाराची घटना काही थांबायचे नाव घेत नसुन वाढतच आहे अश्यातच नेरूळ शहरात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नेरुळमधून समोर आलीय. नराधम बापाने आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याबाबत नराधम बापाविरोधात पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपी बाप हा फरार असून पोलीस शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात स्वयंपाकी असणाऱ्या संशयित आरोपी अशोक चौधरी हा नेरूळमध्ये एका घरात मागील 20 वर्षांपासून स्वयंपाकी म्हणून कामाला होता. त्याच्यासोबत त्याने आपली मुलगी आपल्या गावातून मागील एक वर्षापूर्वी आणली होती. ती त्याच्यासोबत राहत होती. घराचे मालक आणि पत्नी तीन मुले अशी पाच जणे राहत होती
या नराधमाने आपल्याच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील एक वर्षांपासून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. याची माहिती घरातील मालकीण असलेल्या महिलेला मिळताच मुलीलासोबत घेऊन नेरूळ पोलीस स्टेशन गाठले आणि नराधम बापाविरोधात तक्रार केली.
पोलिसांनी मुलीच्या कागदपात्रांची चौकशी करून ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनात आल्याने बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नराधम बाप फरार असल्याने त्याचा पोलीस शोध घेत आहे