हिटरच्या ‘शॉक’ने पारोळा येथील तरूणाचा दुर्दैवी मृत्यू.

Spread the love

पारोळा :- तालुक्यातील शिरसमणी येथे घरातील हिटरचा शॉक लागल्याने एका १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २१ रोजी दुपारी ४.१५ वाजता घडली. दानिश युनूस पिंजारी (वय १७) हा तरुण आपल्या राहत्या घरात हिटरचा शॉक लागल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

ही माहिती मिळताच नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात आणले. परंतु, तपासणी करुन डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत विनोद सलीम पिंजारी शिरसमणी यांनी दिलेल्या माहितीवरुन पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास प्रदीप पाटील करत आहेत.

टीम झुंजार