पाचोरा :- धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. रोजगार सेवकाला मानधनापोटी देण्यात येणार्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्या ग्रामसेवकासह महिला सरपंच पतीला लाचलुचपत विभागाने आज रंगेहात पकडले आहे. पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथे ही घटना घडलीय.
तक्रारदार हे वरसाडे ता. पाचोरा येथील रहिवाशी आहे. तक्रारदार हे ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजने अंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम करतात. मानधनाच्या धनादेशवर सही करून देण्याच्या मोबदल्यात ६ हजाराची लाच ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे(वय-५२) रा.प्लॉट नं.३, शिवनेरी नगर,भडगाव रोड, चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगांव आणि सरपंच पती शिवदास भुरा राठोड रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा, जि.जळगाव यांनी मागितली.
मात्र चार हजारावर तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे मंगळवार, 24 रोजी तक्रार नोंदवण्यात आली. मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा.कार्यालयात सापळा रचण्यात आला. आरोपी राठोड यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.
यांनी यशस्वीपणे सापळा रचला.
हा सापळा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग के.बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्दन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.