
झुंजार । प्रतिनिधी
पारोळा :- आमदार चिमणरावजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी जलसंपदा विभागांतर्गत नुकतेच भामरखेडा तलावासाठी २८.६० कोटी रूपयांची मंजुरी मिळाली होती. त्याअनुषंगाने आज जोगलखेडे येथील जिजाबराव पाटील, गोविंद पाटील, हनुमंतखेडे येथील भास्कर रंगराव पाटील, लक्ष्मण पंडीत पाटील, विजय चिंधा पाटील,
दिपक नामदेव माळी, पी.एम.पाटील, रविंद्र प्रताप अहिरे, गौतम बाबुलाल मैराळे, जिभाऊ भिमराव अहिरे, सुभाष धोंडु माळी, पंढरीनाथ धर्मा पाटील वाघरे येथील बापु राजधर पाटील, हिम्मत धोंडु पाटील, रंगराव रामा पाटील, नाना नथा पाटील, हेमराज खंडु पाटील, रावसाहेब मगन पाटील, गोरख लाला पाटील, शेनपडु मांगु पाटील, ठाणसिंग किसन वाघ, गोरख मुरलीधर पाटील, दगा
साहेबराव पगारे यांचेसह जोगलखेडे, हनुमंतखेडे व वाघरे येथील ग्रामस्थांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचा सत्कार करून आभार मानले. आ. चिमणरावजी पाटील यांनी सदरील काम येत्या वर्षभरात पुर्ण करण्याचे ठोस आश्वासन देखील उपस्थितांना ह्यावेळी दिले.