प्रतिनिधी। एरंडोल
एरंडोल :– येथील ग्रामीण रुग्णालयात पंधरा ते अठरा वयोगटातील मुला मुलींसाठी कोरोना लसीकरणाची आज सकाळी दहा वाजेपासून सुरुवात करण्यात आली.
लसीकरणासाठी 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींचा उत्साह अतिशय अल्प प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरण हे अतिशय संथ गतीने सुरू होते. आज ग्रामीण रुग्णालय येथे फक्त 81 मुला-मुलींचे लसीकरण करण्यात आले.
आज लसीकरणाच्या ठिकाणी उपविभागीय प्रांताधिकारी विनय गोसावी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य संजय चौधरी यांनी लसीकरण केंद्रावर भेट दिली.लसीकरण केंद्रावर इंटरनेट सेवा अतिशय संथ गतीने चालत असल्यामुळे रजिस्ट्रेशन करण्यासाठी थोडा वेळ लागत होता.
लस घेण्यासाठी मुले एकटेच तर मुली आपल्या पालकांसोबत लसीकरणच्या ठिकाणी येत होते.
ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कैलास पाटील, योगिता बडगुजर, पुनम धनगर, व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी लसीकरणासाठी परिश्रम घेत आहे.
Home ताज्या बातम्या एरंडोल ग्रामीण रुग्णालय येथे 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणारा...