जळगावचे बालाजी जॉब प्लेसमेंटचे संचालक ॲड.विजय दर्जी ; TET म्हाडा पेपर फुटी प्रकरणि पुणे पथकाच्या ताब्यात.

Spread the love

जळगाव :- सध्या महाराष्ट्रात वेेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे उघडकीस येत आहेत.आश्यातच जळगाववत TET म्हाडा पेपर फुटी प्रकरणि मोठीं कारवाई केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळा प्रकरण जळगावपर्यंत येऊन पोहोचले आहे. बुधवारी पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावात गोलाणी मार्केटमध्ये बालाजी जॉब प्लेसमेंटमध्ये झाडाझडती घेतली. संस्थेचे संचालक ॲड. विजय दर्जी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच कार्यालयातून आणखी काही पुरावे हस्तगत करण्यात आले असून इतर दोघे रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तांत्रिक पुराव्याच्या आधारावर दर्जी यांना ताब्यात घेतल्याची माहिती पुणे सायबरच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी माध्यमांना दिली आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईत जळगाव, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, यावलमधील काही जण रडारवर आहेत.

TET प्रकरणी जळगाव, भडगावसह यावल व पारोळा तालुक्यातील काही एजंटाकरवी जिल्ह्यात टीईटी घोटाळ्यातील गैरव्यवहाराला मोठी चालना देण्यात आली होती. चौकशीनंतर तपासाची दिशा त्यांच्या दिशेने असेल, हे स्पष्ट झाले होते. दरम्यान, जी.ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर सुरंजित गुलाब पाटील (५०) रा.उत्तरानगर, नाशिक, स्वप्निल तीरसिंग पाटील रा.शिक्षक कॉलनी, चाळीसगाव, जळगाव अशी अटक केलेल्यांची नावे होती. टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यात पोहोचल्यानंतर सर्वात आधी चाळीसगावमधून काही जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता जळगावातील वकील विजय दर्जी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

धक्कादायक म्हणजे म्हाडा पेपरफुटीप्रकरणी काही कॉल रेकॉर्डिंग, सोशल मीडियाचे स्क्रीन शॉट, मोबाईल कॉल डिटेल्स, ऑनलाइन व्यवहार, मेल यासह इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारावर दर्जी यांचे नाव समोर आले. त्यांची चौकशी केली जात असून, चौकशीत काय निष्पन्न होते, त्यानुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती नवटके यांनी दिली आहे.

टीम झुंजार