पूर्णा येथे विना मास्क फिरणार्‍या लोकांवर दंडात्मक कारवाई व विद्यार्थी विद्यार्थीनी चे लसीकरण .

Spread the love

पूर्णा प्रतिनिधी:– मागील काही दिवसापासून दबा धरून बसलेल्या कोरोनोने आपले दिवस दाखविण्यास सुरुवात केली असून परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पॉझिटिव आल्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले असून आरोग्य विभागाने कात टाकली आहे तर सोमवार मंगळवार दोन दिवस पूर्णाशहरांमध्ये 16 ते 18 वर्षे गटातील विद्यार्थी विद्यार्थीनी चे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला, असून शाळा महाविद्यालयांमध्ये लसीकरण आणि वेध घेतलाअसल्याचे दिसून येत आहेकेंद्र व राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता मागील आठ दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे.

या वाढीचा थेट परिणाम पूर्ण शहरांमध्ये सुद्धा झाला असून पूर्ण शहरांमध्ये सुद्धा काही रुग्ण असल्याची भीती प्रशासनाच्या वतीने व्यक्त केली जात असताना. परभणी जिल्हा अधिकारी अंचल गोयल यांनी कडक मोहीम राबविली असून िल्ह्यामध्ये विना मास्क फिरणार्‍या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत त्यामुळे सोमवार मंगळवार दोन दिवस पूर्ण येथील आरोग्य पथक व नगरपालिकेच्या पथकाने पूर्ण शहरांमध्ये संयुक्त मोहीम उघडली असून येणाऱ्या जाणार वाहनावर करडी नजर ठेवली जात आहे तर पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शहरातील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये लसीकरणाने वेग घेतला आहे मंगळवारी दिवसभर पूर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शाळेमध्ये जाऊन घराघरात लसीकरण करण्याची मोहीम उघडली असून पूर्णा शहरातील अभिनव विद्या प्रसारिणी शाळा या दोन शाळांमध्ये अनुक्रमे 70 व विद्यार्थी विद्यार्थिनींचेविद्यार्थ्यांची लसीकरण करण्यात आली आहे तर 16 ते 18 वर्षे गटातील विद्यार्थी हुडकून काढून त्यांचे लसीकरण करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे दरम्यान तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पत्करण्यास प्रशासन अलर्ट झाले असून नगरपालिका सुद्धा अलर्ट झाली आहे पूर्ण शहरांमध्ये तिसऱ्या लाटेचा रुग्णांची मोठी संख्या वाढ पाहता नगरपालिका व आरोग्य प्रशासनाने संयुक्त मोहीम उघडली असून मंगळवारी दिवसभर मात्र प्रशासनाकडून लसीकरणाला वेग दिला आहे मंगळवार दिनांक चार जानेवारी रोजी पूर्णा शहरातील अभिनव विद्या प्रसारण शाळेमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाडेकर डॉक्टर भांडेकर मॅडम नायब तहसीलदार नितिष कुमार बेल्लू फारुख अब्दुल्ला वहीत आकाश जोंधळे व कृष्णा चापके झांबरे पुजा काळे फैजुल्लाखान सर्व कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले असून लसीकरणाची मोहीम अधिकच वेगाने सुरू राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाडेकर यांनी यावेळी बोलताना दिली.मुख्याध्यापक उमाटे विद्या प्रसारिणी शाळा पूर्ण जवाहरलाल नेहरू शाळेची मॅडम.

टीम झुंजार