
झुंजार । प्रतिनिधी
पारोळा – तालुक्यातील वेल्हाणे खु विविध कार्यकारी सोसायटीची निवणडुक २७ मे रोजी पार पडली. या निवडणुकीत १३ जागेसाठी मतदान प्रक्रीया घेण्यात आली. शिवसेनेने दाखल केलेल्या ८ अर्जांच्या विरोधात एकही अर्ज प्राप्त न झाल्याने वेल्हाणे खु विकासोवर शिवसेनेने १३ पैकी ८ जागांवर बिनविरोध विजय मिळवत भगवा फडकविला आहे.
पितांबर शामराव पाटील, दिलीप मधुकर पाटील, राजेंद्र ढोमण पाटील, छोटु गिरधर सोनवणे, हिम्मत बाबुराव गायकवाड, संजय साहेबराव पाटील, ज्योती दिपक पाटील व नाना बाबुलाल पाटील अशी विजयी उमेदवारांची नावे आहे. या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार मा. आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा देत अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शेतकी संघ संचालक राजेंद्र पाटील, वेल्हाणे येथील राजेंद्र पाटील, चेअरमन उखाजी निंबा पाटील, मुकेश नाना पाटील, योगेश रविंद्र पाटील, भुषण हिरामण पाटील, समाधान सुरेश पाटील यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.