एरंडोल प्रतिनिधी:- ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कराचा वेळेवर भरणे केल्यास गावाच्या सर्वांगीण विकास होतो. आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर कामाचे नियोजन केले पाहिजे. ग्रामपंचायतीने नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी दिले पाहिजे, गाव हागणदारी व तंटामुक्त झाले पाहिजे, गावाच्या विकासासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कराचा वेळेवर भरणा केला पाहिजे, गावात फळ येत असलेल्या वृक्षांचे जास्तीत जास्त वृक्षारोपण केले पाहिजे, गावातील निवडणुका संपल्या बरोबर गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असे प्रतिपादन भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच एवढ्याशा लहान गावाला आमदार चिमणराव पाटील यांनी गावाच्या विकासासाठी एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांची सुद्धा स्तुती केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चिमणराव पाटील हे होते तर पाहुणे म्हणून माजी सरपंच आदर्श गाव पाटोदा तालुका जिल्हा औरंगाबाद येथील भास्करराव पेरे पाटील हे होते.
ढोल ताशाच्या गजरात गावातील ग्रामस्थांनी मान्यवरांचे स्वागत केले
आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत निपाने,ताडे ते आनंद नगर तांडा रस्त्याचे डांबरीकरण करणे अंदाजित रक्कम एक कोटी 69 लाख 65 हजार तसेच निपाणे येथे गायत्री माता मंदिर परिसरात सभा मंडप बांधणे, व्यायाम शाळा इमारत बांधणे, अभ्यासिका इमारत बांधणे, गावांतर्गत काँक्रीटीकरण करण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, काँक्रीट गटार बांधकाम करणे, शौचालय व हँडवॉश स्टेशन बांधणे व भूमिगत गटार बांधणे असे 55 लाख 50 हजार रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा दिनांक 3 जानेवारी सायंकाळी सात वाजता पार पडला.
यावेळी आमदार चिमणराव पाटील अध्यक्षीय भाषणात बोलत होते की आधी आम्ही काम करतो मग बोलतो निपाने गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देतो असे सांगितले.
दरम्यान आदर्श गाव पाटोदा चे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या 90 मिनिटांच्या भाषणात गावाच्या विकास करण्यासाठी माहिती दिली व आमदार चिमणराव पाटील यांची स्तुती केली.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन,युवा सेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन, माजी पंचायत समिती प्रभारी सभापती अनिल महाजन, उपसभापती विवेक पाटील, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा ताई पाटील, युवा सेनेचे तालुका प्रमुख घनश्याम पाटील, कासोद्याचे सरपंच महेश पांडे, यांचेसह तालुका व परिसरातील इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
निपाने ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तसेच युवा सेनेचे तालुका समन्वयक कमलेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.