दादर अमृत्सर पठाणकोट एक्सप्रेसला निंभोरा येथे थांबा मिळण्याकरिता खासदार रक्षाताई खडसे यांना निंभोरा ग्रामस्थांचे निवेदन

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी.परमानंद शेलोडे


रावेर :- रावेर तालुक्यातील निंभोरा स्टेशनला कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने सर्व पॅसेंजर एक्सप्रेस गाड्या बंद केल्या होत्या तरी करोना संपल्यावर रेल्वे प्रशासनाने अलीकडे देशात रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत परंतु काही ठिकाणी अजून रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस चे थांबे रद्द केले आहे त्यामध्ये निंभोरा स्टेशन पण आहे निंभोरा स्टेशनला 30 ते 40 वर्षापासून दादर अमृत्सर पठाणकोट एक्सप्रेस थांबत होता परंतु रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात पॅसेंजर सह दादर अमृत्सर एक्सप्रेस बंद केला कोराणा काळ संपल्यावर पॅसेंजर एक्सप्रेस रेल्वे रुळावर धावू लागले परंतु निंभोरा ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या कारण निंभोरा स्टेशनला अजून पर्यंत रेल्वे प्रशासनाने दादर अमृत्सर पठाणकोट एक्सप्रेस ला थांबा दिला नाही त्यामुळे निंभोरा स्टेशनला लागून असलेल्या खेड्या पाड्या वरील व निंभोरा प्रवाशांच्या फार हाल-अपेष्टा होत आहे कारण येथून मुंबई दिल्ली जाणारे प्रवासी आहेत पण रेल्वे प्रशासनाने निंभोरा स्टेशनला एक्सप्रेसचा थांबा न दिल्याने या प्रवाशांना सावदा रावेर येथे जावे लागत आहे.

तरी निंभोरा स्टेशनला दादर अमृत्सर पठाणकोट एक्सप्रेस चा पूर्वीपासून एकमेव थांबा आहे परंतु हा थांबा अजून सुरू झाला नाही तरी नुकतेच काही दिवसापूर्वी खासदार रक्षाताई खडसे यांना निंभोरा ग्रामस्थांनी या थांबा चे निवेदन देऊन मागणी केली आहे तरी रक्षाताई खडसे खासदार यांनी रेल्वे प्रशासनाच्या स्मरणात हे आणून द्यावे व दादर अमृतसर पठाणकोट एक्सप्रेसचा थांबा पूर्वरत चालू करावा अशी निंभोरा ग्रामस्थांची मागणी निवेदना द्वारे जोर धरून आहे

टीम झुंजार