तोतया पोलिस : अंगावरचे सोने काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवण्याचे सांगून डल्ला ; सव्वा लाखांचा ऐवज लुटला

Spread the love

जळगाव :- चोर चोरी करण्यासाठी काय काय युक्ति करतिल याचा नेम नाही अशिच एक घटना जळगावातीलजळके-लोणवाडी रस्त्यावर घडलई परिसरात घडली आहे. ‘या परिसरात चोऱ्या वाढल्या आहेत, तुमच्या अंगावरील सोने काढून गाडीच्या डिक्कीत ठेवा’ असा सल्ला देत दोन तोतया पोलिसांनी एका ८० वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावरील १ लाख २६ हजार रुपयांचे सोने हातचलाखीने लुटून घेतले. ही घटना ३० मे रोजी सकाळी १० वाजता

काय आहे घटना..?

जळके-लोणवाडी रस्त्यावर घडली. श्यामराव लोटू तायडे (वय ८०, रा. दौलतनगर) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. तायडे हे निवृत्त वायरमन आहेत. त्यांची जळगाव तालुक्यातील लोणवाडी शिवारात आठ एकर जमीन असून, ते सध्या शेती करीत आहेत. शेतीकामाच्या निमित्ताने ३० रोजी सकाळी १० वाजता ते दुचाकीने (क्रमांक एमएच-१९, बीएक्स-५६३५) लोणवाडीकडे जात होते. यावेळी त्यांना रस्त्यात दोन जणांनी हात देऊन थांबवले. पोलिस असल्याचे भासवून ‘साहेबांनी आमची ड्यूटी इकडे लावली आहे. या भागात चोऱ्या होत आहेत. तुमच्या अंगावरील चेन, अंगठी काढून गाडीच्या डिक्कीत ठेवा’ असे त्यांनी सांगितले. त्यानुसार तायडे यांनी अंगठी व चेन काढून रुमालात गुंडाळून डिक्कीत ठेवत असताना त्या पैकी एकाने स्वत: हातात घेत डिक्कीत ठेवून देतो असे सांगितले. तर दुसरा भामट्याने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. हातचलाखी करून तोतया पोलिसांनी हे सोने काढून घेतले. यानंतर दोघे चोरटे विटनेरच्या दिशेने दुचाकीने निघून गेले. काही वेळानंतर ही बाब तायडे यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी ३० रोजी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहे.

दीड महिन्यात तीन घटना :-

निर्मनुष्य परिसराचा चोरटे घेताय फायदा : याच मार्गावर गेल्या दीड महिन्यातली ही तिसरी लुटीची घटना आहे. एका घटनेत बचत गटांचे पैसे गोळा करणाऱ्या तरुणास लुटले होते. गावापासून लांब अंतर असल्यामुळे हा परिसर निर्मनुष्य असतो. शिवाय या मार्गावर सर्वत्र शेती आहे, लपण्यासाठी जागा आहे, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. या सर्व बाबींचा फायदा चोरटे घेत आहे

टीम झुंजार