आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार का?

Spread the love

देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 14 हजार कोटींचा जीएसटी परतावा देण्यात आला आहे. आतातरी केंद्रावर खापर न फोडता राज्य सरकार पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार का, असा टोला लगावत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटीच्या परताव्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

याबाबत ट्विट करताना फडणवीसांनी म्हटले आहे की, “31 मे 2022 पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली. यात महाराष्ट्राला सर्वाधिक 14,145 कोटी रू. मिळाले. आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की पुन्हा आज 1 जूनपासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार ?

पुढे फडणवीस म्हणतात की, राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ जेव्हा-जेव्हा महाविकास आघाडीवर आली, तेव्हा प्रशासनाची ‘ढकलगाडी’ करण्यातच त्यांनी धन्यता मानली. केंद्रावर दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार ? आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काळ कमी करा!, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला आहे.

टीम झुंजार