९० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत, क्वारंटाईन कालावधी ७ दिवसांचा : राजेश टोपे

Spread the love

मुंबई:- राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर मंत्रालयातील बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तीन दिवसात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होत असल्याने चिंता वाढली आहे. ९० टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत, हा दिलासा आहे;पण वाढती रुग्‍णसंख्‍या पाहता गर्दी रोखण्यासाठी निर्बंध लावावेच लागतील, असे आराेग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्‍पष्‍ट केले.या वेळी टाेपे म्हणाले, होम क्वारंटाईन, होम आयसोलेट होणं  हे महत्त्वाचं आहे. काेणती पथ्ये पाळली पाहिजेत, हे रुग्णाला कळालं पाहिजे. सौम्य लक्षण असणाऱ्यांना गृहविलगीकरणात ठेवून मॉनिटरींग करणे आवश्‍यक आहे, असेही ते म्‍हणाले.आरटीपीसीआर चाचणीबरोबरचं अँटिजेन टेस्टवर भर द्यावा लागणार आहे. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. चौकाचौकात अँटिजन टेस्टची सुविधा तर आपण  बुस्टर डोसची सुविधा खासगी रुग्णालयात उपलब्ध करून देणार आहाेत. उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले.

क्वारंटाईनचा कालावधी सात दिवसांचा असणार

क्वारंटाईनचा कालावधी ७ दिवसांचा असणार आहे. अँटिजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीसीआर करण्याची आवश्यकता नाही. अँटिजेन टेस्टचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी लवकरच यंत्रणा उभारणार. कोरोना उपचारासाठी आवश्यक गोळ्यांचा पुरवठा करण्याची विनंती केंद्राला करणार. गर्दी रोखण्यासाठी निर्बंध लावावेच लागतील, असेही टोपे यांनी नमूद केले.

टीम झुंजार