प्रतिनिधी । एरंडोल:– एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे येथील दोन व कासोदा येथील दोन असे चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तालुक्यात कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. दिनांक 4 जानेवारी रोजी कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेण्यात आलेल्या कोरोना टेस्टमध्ये हनुमंतखेडे येथील 33 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला असे एका घरातील दोन व्यक्तीच्या अहवाल पॉझिटिव आला आहे तसेच कासोदा येथील 20 वर्षीय युवक व 34 वर्षीय महिला असे तालुक्यातून एकूण चार रुग्ण आढळून आले आहेत. ज्या नागरिकांना कोरोणा चे लक्षण दिसत असतील अशा नागरिकांनी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय येथे तात्काळ कोरोणा टेस्ट करून घ्यावी असे आव्हान आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.