पारोळ्यात देशी दारुची चढ्या दराने विक्री,माजी नगरसेवक सुनील पाटील यांची कारवाईची मागणी

Spread the love
फोटो-संग्रहित गुगल

झुंजार । प्रतिनिधी
पारोळा :-
शहरात देशी दारू परवानाधारक दुकानदारांकडून ग्राहकांना जादा भावाने देशी दारू विकून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनिल पाटील यांनी कारवाईची मागणी केली आहे.

देशी दारूची विक्री बऱ्याच वर्षापासून १० रू. जादा घेवून विकली जात होती. परंतु मे-जून २०२२ या महिन्यात ६० रु. ची नीप ही ७५ रु. बोर्ड लावून विकली जात आहे. देशी दारू ग्रहण करणारा हा सर्वसामान्य ग्राहक आहे.

देशी दारू ग्रहण करणारा मोठा वर्ग आहे.मात्र याचं ग्राहकाकडून कमालीची लूट केली जात आहे.व्यसनाच्या आहारी गेलेला सर्वसामान्य ग्राहक ही लूट निमूटपणे सहन करीत आहे.मात्र शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा सामंजस्य ग्राहक सुनील पाटील यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग अमळनेर व जळगाव विभागाकडे कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित दुकानदारांवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील सुनिल पाटील यांनी दिला आहे.परिणामी कारवाई काय होते याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

टीम झुंजार