
झुंजार । प्रतिनिधी
पारोळा :- श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित आप्पासाहेब यू.एच.करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा 2022 चा निकाल आज जाहीर झाला आहे. शाळेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता कायम ठेवत शंभर टक्के निकाल लागला आहे. विशेष म्हणजे यावर्षी शाळेत पत्रकार विश्वास चौधरी यांचा मुलगा तेजस व त्यांचे मोठे भाऊ प्रदीप चौधरी यांची मुलगी सुजाता या दोघी भाऊ बहिण यांनी सारखे गुण मिळवून संयुक्त रित्या शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विज्ञान शाखेतून चौधरी तेजस विश्वास (शेकडा गुण 82.67%) तसेच चौधरी सुजाता प्रदीप (शेकडा गुण 82.67%) मिळाले आहेत. विशेष म्हणजे संस्कृत या विषयात दोघांनी 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.
द्वितीय क्रमांक- पाटील तेजस्विनी राजेश (शेकडा गुण 81.50%) तृतीय क्रमांक- पाटील ओमप्रसाद रामचंद्र (शेकडा गुण 81.33%) तर चतुर्थ क्रमांक- भावसार प्रथमेश दिपक (शेकडा गुण 81.00%)तर पाचवा क्रमांक- चौधरी मितेश मुकुंदा (शेकडा गुण 80.07%) मिळविला. तसेच विद्यालयातून एकूण 97 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 80% वर 12 विद्यार्थी 70% वर 23 विद्यार्थी तर 60% वर 48 विद्यार्थी 51% वर 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या शंभर टक्के निकाल लागला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु एच करोडपती तसेच सचिव डॉ. सचिन बडगुजर, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य विजय बडगुजर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना विषय शिक्षक शिवाजी पाटील, हिमांशू पाटील, वैशाली पाटील, तृप्ती मोरे मॅडम, चिंतामण बडगुजर यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी बोलून दाखवले आहे.
मराठी पत्रकार संघाचे एरंडोल तालुका अध्यक्ष संजय चौधरी व टीम झुंजारच्या वतीने करोडपती विद्यालयत प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झालेले तेजस व सुजाता या भाऊबहिणीचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या