देवगांव विकासोवर शिवसेनेचा भगवा…
१३ पैकी १३ जागांवर सेनेचा बिनविरोध विजय

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
पारोळा –
तालुक्यातील देवगांव विविध कार्यकारी सोसायटीची निवणडुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत १३ जागेसाठी मतदान प्रक्रीया घेण्यात आली. यात शिवसेनेने दाखल केलेल्या १३ अर्जांच्या विरोधात एकही अर्ज प्राप्त न झाल्याने देवगांव विकासोवर शिवसेनेने १३ पैकी १३ जागांवर बिनविरोध विजय मिळवत भगवा फडकविला आहे.

चेअरमन – राजेंद्र मुरलीधर पाटील, व्हा.चेअरमन – सुभाष खंडु पाटील, दिनकर धर्मा पाटील, रोहिदास आधार पाटील, अशोक सोनु पाटील, दिलीप फकीरा ठाकरे, रावण नथु मराठे, भुरमल हिरामण भिल्ल, भरत अशोक वाघ, मधुकर सुपडु कोळी, मंगलाबाई शिवाजी पाटील, सरस्वताबाई राजाराम पाटील अशी विजयी उमेदवारांची नावे आहे.

या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार मा. आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी दुरध्वनीव्दारे तर पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा देत अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच विकासोवर पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील यांची देखील बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित सदस्यांतर्फे त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी शेतकी संघ संचालक दासभाऊ पाटील, सचिव राजेंद्र पाटील यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

टीम झुंजार