मुंबई : राज्यात 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने बुधवारी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीकडूनही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत रामराजे निंबाळकर यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून नाट्यमय घडामोडी घडत असताना, दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. अखेर जाहीर करण्यात आलेल्या यादीत खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.