दुर्दैवी घटना!चक्रीवादळामुळे विजेच्या तारा तुटल्याने त्याच्या शाँक लागून 5 वर्षीय बालकाच्या मृत्यू

Spread the love

रावेर तालुका । प्रतिनिधी
खिरोदा प्र.यावल येथे वादळी वार्‍यामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने एका ५ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी सावदा पोलीसात नोंद करण्यात आली. दरम्यान, घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यसह विविध ठिकणी पाऊस आणि वादळ वाऱ्याचा तडाखा सुरु आहे. तसेच याचा अनेक ठिकणी चांगलाच फटका बसत आहे. काल दि. ८ रोजी सायंकाळी रावेर तालुक्यात देखील वादळी वार्‍याने जोरदार तडाखा दिला. यामुळे खिरोदा तसेच परिसरातील गावांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पत्रे उडाली, तारा देखील खाली पडल्या.

यामुळे या भागातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज सकाळी खिरोदा येथील बाहेरपुरा भागातील रहिवासी असणार्‍या अफसर अजित तडवी यांच्या ५ वर्षाच्या चिमूल्याचा वादळात पडलेल्या तारांना त्याचा स्पर्श झाल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

खाली पडलेल्या तारांची तात्काळ दुरुस्ती करा

वादळी वाऱ्यांमुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांमुळे चिमुकल्याला मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तसेच यामुळे परिसरात अनेक संकटे निर्माण झाले असून महावितरणने याकडे तात्कळ लक्ष घालून खाली पडलेल्या व लोंबकणाऱ्या तारा तात्कळ दुरुस्ती करावी. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

मयत बालकाच्या नातेवाईकाना अधिकाऱ्याची भेट

खिरोदा येथील बेघर वस्तीत काल दुपारी झालेल्या चक्रीवादळामुळे विजेच्या तारा तुटल्याने लहान पांच वर्षांच्या मुलाचा शाॅक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.घटनास्थळी पाहाणी करताना कर्तव्यदक्ष अधिकारी सौ उषाराणी देवगुणे, खिरोदा सर्कल श्री बंगाले साहेब,तलाठी सावदा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी श्री गायकवाड साहेब सह आमदार शिरीष दादा चौधरी यांचें सहाय्यक भानुदास मेढे, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे, उपसरपंच सावखेडा अल्लादिन तडवी, महेंद्र पाटील गौरखेडा ग्रामपंचायत सदस्य,सह अनेकांनी सदर कुटुंबाला सहानुभूती देवून लवकरात लवकर शासनाकडून सर्वपरी मदत मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन मा.रावेर तहसीलदार यांनी दिले.

टीम झुंजार