सुरत-भुसावळ पॅसेंजर ट्रॅकवर येण्यापूर्वीच रद्द ; प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

Spread the love

जळगाव : काेराेनामुळे अडीच वर्षांपासून बंद असलेली सुरत-भुसावळ पॅसेंजर ८ जून पासून सुरु होणार असल्याचे नोटीफिकेशन वेस्टर्न रेल्वेने काढल्यानंतर प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत होते. मात्र अचानक आता पुढील आदेशापावेतो ही गाडी रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र भुसावळ विभागाला प्राप्त झाल्याने रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर ही ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटणार होती. दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी ७.५५ वाजता भुसावळ स्थानकात पोहोचणार होती. मात्र, ही गाडी सुरत स्थानकातून सुटण्याआधीच रद्द केल्र्याचे पश्चिम रेल्वे स्पष्ट केले. गाडीची माहिती अाॅनलाइन सिस्टिममधून काढून टाकल्याने कुठेही बुकिंग झाले नाही. खान्देशातून सुरतकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांसाठी ही गाडी अतिशय सोयीची होती. मात्र, ट्रॅकवर येण्यापूर्वी गाडी रद्द झाल्याने हिरमोड झाला

असे होते गाडीचे थांबे….

गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ९ जूनपासून भुसावळहून सायंकाळी ७.३० वाजता सुटणार होती. तिला जळगाव, पाळधी, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, व्यारा, बारडोली, उधना व सुरत स्थानकात थांबा हाेता. मात्र, अाता येणारी अाणि जाणारी ही पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे.

टीम झुंजार