पुतण्याने संख्या काकुस वाहनाने चिरडले! पाणी भरण्यावरून झाला दोन भावांमध्ये वाद,अन्य तीन जखमी

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
पारोळा :-
तालुक्यातील शेळावे येथे दोन सख्या भावांमध्ये शेतात पाणी भरण्यावरून वाद झाला.वादाच्या पार्श्वभूमीवर दत्तू सांगळे यांनी आपला मुलगा राहुल यास बोलाविले असता राहुल याने आपल्या इंट्रा व्ही 10 गाडी(छोटा हत्ती) वेगाने चालवत आणून रोडावर उभे असलेल्या काकू,आईसह चुलत भावाला चिरडले यात काकूंचा मृत्यू झाला तर तीन जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.

या बाबत सविस्तर माहिती अशी शेळावे जवळील चिखलोड रोडवर बापू काळू सांगळे व दत्तू काळू सांगळे या दोघे सख्या भावांची ८ बिघे शेती आहे.प्रत्येकी ४ बिघे शेती दोघांच्या नावावर आहे.मात्र या दोघांच्या शेतीला विहीर मात्र एकच सामाईक आहे.परिणामी शेतातील पिकांना पाणी भरण्यावरून दोघांमध्ये वाद झाला.या वादाच्या पार्श्वभूमीवर दत्तू सांगळे यांनी आपला मुलगा राहुल सांगळे याला घटनेची कल्पना देवून घटनास्थळी बोलावून घेतले.

राहुल सांगळे याने आपल्या ताब्यातील टाटा कंपनीची इंट्रा व्ही १० (छोटा हत्ती) हि गाडी क्रमांक एम एच १९ सी वाय ८१८३ हि भरधाव वेगात चालवत आणुन रोडवर उभे असलेल्या अल्काबाई बापू सांगळे (४५) विद्या महेंद्र सांगळे, मनिषा दत्तु सांगळे, अविनाश प्रभाकर सांगळे सर्व रा शेळावे ता पारोळा यांच्या अंगावर गाडी घातल्याने सख्या काकू अल्काबाई सांगळे जागीच ठार झाल्या तर उर्वरित तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमीमध्ये राहुल सांगळेचा आईचा देखील समावेश आहे.

याबाबत बापू काळू सांगळे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पुढील तपास करीत आहेत.

टीम झुंजार