बंदुकीचा धाक दाखवत हाणामारी: जळगावमध्ये सराईत गुन्हेगारास अटक, पिस्तूलसह 4 जिवंत काडतुसे जप्त

Spread the love
सागर सपकाळे (वय २८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे.

जळगाव :- सध्या जळगाव शहरात दहशत पसरल्या च्या घटनान मध्ये वाढ झाली आहे अश्यातच शहरातील शनिपेठेतील कोळीपेठ येथे राहणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. सागर सपकाळे (वय २८) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून शहरात दहशत परसवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

आरोपी सागरविरोधात पिस्तूलचा धाक दाखवून हाणामारी केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तो संशयित आहे. रविवारी दुपारी तो पिस्तूलचा धाक दाखवून परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय श्यामराव पाटील, प्रितम पाटील, सचिन महाजन, पंकज शिंदे यांच्या पथकाने कोळीपेठ परिसरात गस्त केली. यावेळी एका पानटपरीजवळ सागर आढळुन आला. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल सापडले. त्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. सागरविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीकडे सापडलेले पिस्तुल व गोळ्या.

दोघांवर गुन्हे

सागरसह त्याचा भाऊ या दोघांवर शनीपेठ पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशात सागराकडे पिस्तुल, चार जिवंत कडतुस मिळून आल्यामुळे पोलिस सतर्क झाले आहेत. त्याने पिस्तुल कुठून व का आणले याचा तपास पोलिस करीत आहेत.

टीम झुंजार