चारीत्र्याचा संशयावरून विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

Spread the love

जळगाव : – जळगाव शहरातील एका भागातील माहेर आलेल्या विवाहितेचा चारीत्र्याचा संशय घेवून शिवीगाळ करण्यात आली. आहे. याबाबत जळगाव शहर पोलिस ठाण्यात पतीसह सासरकडील मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसात गुन्हा शहरातील एका भागात 23 वर्षीय महिला यांचा विवाह पारोळा तालुक्यातील हिवरखेडी तांडा येथील तरूणाशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती नेहमीच पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत होता.

अनेक वेळा विवाहितेस तिच्या नातेवाईकांनी पतीसह सासरकडील मंडळींना समजावून सांगितले. त्यानंतर महिलेच्या पतीने तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेत अश्लिल शिवीगाळ करून छळ करण्यास सुरूवात केली. तसेच मोबाईल फोडून नुकसान केले. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. सोमवार, 13 जून रोजी दुपारी शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलि ठाण्यात पती, सासू, सासरे, दीर, नणंद, जेठ आणि जेठाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलिस नाईक रवींद्र पाटील करीत आहे.

टीम झुंजार