जळगाव : – सध्या महाराष्ट्रात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरातील एका भागात चोरिचा प्रयत्न एका महिलेने ऊधळुण लावला आहे.
काय आहे घटना ?
अचानक भरवस्तीतील बंगल्यात शिरलेल्या पाच दरोडेखोरांपैकी एकाच्या पोटात जोरात लाथ मारून महिलेने आरडाओरड केली. त्यानंतर शेजारचे लोक धावत आल्याने दरोडेखोरांना दोन मिनिटांतच पळ काढावा लागला. त्याचा दरोड्याचा प्रयत्न फसला. रविवारी रात्री ८.३० वाजता जिल्हापेठ परिसरातील औषधींचे होलसेल व्यापारी अशोक जैन यांच्या बंगल्यात हा थरारक प्रकार घडला. मंगळवारी पहाटे दोन वाजता रिद्धी जैन यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद ; सहावा दरोडेखोर फोनवरून इतरांच्या होता संपर्कात :
दरोडेखोर पळून जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. पोलिसांनी ते छायाचित्र आपल्या ताब्यात घेतले. त्यावरून शोध सुरू केला आहे. या घटनेदरम्यान जैन यांच्या घरात पाच दरोडेखोर होते, तर सहावा दरोडेखोर पार्किंगमध्ये थांबून रेकी करीत होता. तो सतत मोबाइलवरून इतरांच्या संपर्कात होता. शेजारील मंत्री कुटंबीय जैन यांच्या घराकडे धावत येत असताना या दरोडेखोराने घरातील साथीदारांना सूचना देत स्वत: पळ काढला.
असे आहे दरोडेखोरांचे वर्णन
एका दरोडेखोराने राखाडी शर्ट, काळी पँट घातली होती. मजबूत बांधा व अंदाजे ३० ते ३५ वयोगटाचा होता. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्याने हिरव्या व पांढऱ्या पट्ट्याचे टी-शर्ट व आर्मी कलरची वनफोर्थ पँट घातली होती. इतरही तशाच वेशभूषेत होते, अशी माहिती ऊर्मिला जैन यांनी पोलिसांना दिली.