पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी एरंडोल शहरात PUC कॅम्प चे आयोजन

Spread the love

एरंडोल शहर प्रतिनिधी

एरंडोल:-एरंडोल शहरातील सर्व नागरीकांना याव्दारे सुचित करण्यात येते की,माझी वसुंधरा अभियान 2.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हवेचे प्रदूषन कमी करणे कामी शासकीय नियंमानुसार सर्व पेट्रोल / डिझेल गाड्यांचे वार्षिक PUC तपासणी करणे बंधनकारक आहे .

त्यानुसार एरंडोल शहरात रविवार दि.09/01/2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 03 या वेळेत PUC कॅम्प चे आयोजन अग्निशमन केंद्र ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ बस स्टैंड मागे एरंडोल येथे करण्यात आले आहे.तरी ज्या गाडी मालकांकडे वैध PUC प्रमाणपत्र नसेल त्यांनी स्वखर्चाने आपल्या गाड्यांचे PUC प्रमाणपत्र कॅम्प मधे काढून घेण्यात यावे, असे आवाहन एरंडोल नगर पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.

टीम झुंजार