कर्नाटक मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर विटबंना केल्याच्या निषेधार्थ तालुका शिवसेनेच्या वतीने पोलीस स्थानकात दिले निवेदन-

Spread the love


प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- तालुका शिवसेनेच्यावतीने कर्नाटक मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर विटबंना केल्याच्या निषेधार्थ आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील व तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्ष ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेनाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की. अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना कर्नाटक येथे काही समाज कंटकांनी केली असून, त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच मा. मुख्यमंत्री यांनी कर्नाटक राज्य झालेल्या घटनेबद्दल बेताल वक्तव्य करून सदरची घटना हि छोटी असुन याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असे म्हणाले. याबाबत मा. मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जाहीर माफी मागावी.
कर्नाटक चे मुख्यमंत्री अश्या घटनांना प्रोत्साहन देत असतील तर शिवसैनिक शांत बसणार नाही अशा समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी
एरंडोल शहर व तालुका शिवसेना यांच्या वतीने तिव्र शब्दात निषेद व्यक्त करत आहोत.असे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील तालुकाप्रमुख वासुदेव पाटील महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष हिम्मत पाटील, ज्ञानेश्वर आमले उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन पंचायत समिती सदस्य मोहन सोनवणे माजी सभापती गबाजी पाटील तालुका समन्वयक निलेश पाटील विभाग प्रमुख छोटू मराठे देशमुख राठोड राजू धनगर धनराज अहिरे हरीश पांडे देवानंद ठाकूर गजानन पाटील कासोदा उपशहर प्रमुख सोनू शेलार भूषण शेलार अमोल भाई गोटू पाटील आबा पाटील बाळासाहेब पाटील शरद पाटील प्रवीण पाटील दिलीप पाटील विलास पाटील राजू बडगुजर साहेबराव पाटील शिवाजी पाटील चेतन पाटील सचिन पाटील शांताराम पाटील प्रवीण पाटील सोनजी पाटील संभाजी धनगर किरण पाटील आदी उपस्थित होते
फोटो ओळ :- एरंडोल तालुक्याच्या वतीने पो नि ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन देतांना संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील,वासुदेव पाटील,ज्ञानेश्वर आमले,नानाभाऊ महाजन व इतर पदाधिकारी

टीम झुंजार