
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल- देशातील वाढत्या इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद,बजरंग दल आणि विविध संघटनांच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी देशभरात धर्मांध शक्तींनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी याना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.विश्व हिंदू परिषद,बजरंगदल आणि विविध संघटनांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की
देशभरात धर्मांध शक्तींनी विविध ठिकाणी हिंसाचार करून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.हिंसाचार करणा-या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.आगामी काळात अशाच प्रकारे हिंसाचार करण्याचा प्रयत्न केल्यास बाजारान दल,विश्व हिंदू परिषद व हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील,जगदीश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने करण्यात आलेले धरणे आंदोलन शांततेत पार पडले.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अकिल मुजावर,जुबेर तडवी,विकास खैरनार सुनील लोहार,मिलिंद कुमावत यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.
आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष विवेक ठाकूर,बजरंगदलाचे तालुका संयोजक भरत महाजन,संजय पाटील,प्रकाश पाटील,अतुल मराठे,गौरव वाणी,सागर महाजन,वैभव चौधरी,शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन,अमोल भावसार,कुणाल पाटील,मयूर महाजन,भोला पवार,अनिल महाजन,कृष्णा ओतारी, गोपाल महाजन,सिद्धेश वाघ,गणेश पाटील,विक्रांत ठाकूर,अमोल ठाकूर,शुभम वाणी,ऋषिकेश शिंपी,विक्की ढाकणे,सागर मराठे,लोकेश महाले,भावेश तिवारी,मुकेश चौधरी,अँड.अजिंक्य काळे,अँड.प्रेमराज राजपूत, अँड.आकाश महाजन,शुभम चौधरी,हितेश चौधरी,सोनू वंजारी,यशवंत वाघ,गजानन ठोसर,योगेश भोई,रामचंद्र गांगुर्डे,अरुण साळी यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान दि ११ तारखेस काही तरुण घोडका करून गोधळ करीत घोषणा देत होते तर काही तरुण पोलीस स्थानका समोरही घोषणा देत होते अश्या उपद्रवी युवक कार्यवाही करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी यांनी प्रांताधिकारी विनय गोसावी व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या कडे केली आहे.






