
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल- इमारतीचे बांधकाम करीत असतांना पाया मजबूत असेल तर कितीही माजले बांधता येतात,त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा पाया असल्यामुळे त्यांच्या जिवनात प्राथमिक शिक्षणाला महत्वाचे स्थान असल्याचे प्रतीपादान आमदार चिमणराव पाटील यांनी केले.
खडकेसिम (ता.एरंडोल) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्याना शालेय गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण प्रसंगी ते बोलात होते.यावेळी विद्यार्थ्यांना आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते गणवेश आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले.कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे व पालकांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया असल्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा असे आवाहन केले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करावी असे सांगितले.विद्यार्थ्याची शालेय प्रगती,गुणवत्ता,शैक्षणिक प्रगती याबाबत पालकांनी शिक्षकांच्या कायम संपर्कात राहावे असे आवाहन केले.यावेळी २३३ पैकी १९५ विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी गटविकास अधिकारी डी.ए.जाधव यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.मुख्याध्यापिका क्षमा साळी यांनी सुत्रसंचलन केले.धनराज भामरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास सरपंच विकास सोनावणे,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,युवासेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील,उपसरपंच अशोक पाटील,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल जोगी,राजेंद्र राठोड,ज्ञानेश्वर पाटील,आबा जोगी,सुपडू जोगी,विष्णू गुजर,आत्माराम वंजारी,संदीप पाटील,बद्रीनाथ वंजारी यांचेसह ग्रामपंचायत सदस्य,पालक,विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.





