
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-येथील अंजुमन ए इस्लाम सोसायटी संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल आणि ग्रामीण उन्नती मंडळ संचालित गोपी गोल्ड इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी शाळा व वर्ग खोल्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते.
गोपी गोल्ड इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच चॉकलेट व फुगे देऊन शिक्षकांनी स्वागत केले.यावेळी शाळेच्या आवारात असलेल्या सेल्फी फोटोस्थळी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.शाळा परिसर आणि वर्गखोल्यांच्या आकर्षक सजावटीमुळे पालकांनी समाधान व्यक्त केले.संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते आणि माध्यमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण यांनी पहिल्या दिवसाच्या नियोजनाबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक केले.कार्यक्रमास शिक्षक व पालक उपस्थित होते.
अँग्लो उर्दू हायस्कूल-
येथील अंजुमन ए इस्लाम सोसायटी संचालित अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम यांचेहस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्याना शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी अध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम यांनी विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून यश प्राप्त करावे असे आवाहन केले.मुख्याध्यापक अयाज शेख यांनी प्रास्ताविक केले.सलीम शेख यांनी सुत्रसंचलन केले.अमजद शेख यांनी आभार मानले.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष जाकीर सय्यद,सहसचिव अकिल जहिरोद्दिन शेख,कोशाध्यक्ष शेख रहीम शेख शफी,संचालक एजाज अहमद,हुसेन ठेकेदार,शेख लतीफ,पत्रकार कमरअली सय्यद,शेख साबीर मुजावर,यासीन खान,मुशिरोद्दिन शेख यांचेसह व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.शाळेच्या पहिल्याच दिवशी विविध रंगाच्या वेशभूषेत उपस्थित असलेले विद्यार्थी आणि शाएची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
फोटो ओळी-१)एरंडोल येथे गोपी गोल्ड स्कूलमध्ये विविध रंगाचे पोशाख परिधान केलेले विद्यार्थी.
२) anglo उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करताना संस्थेचे अध्यक्ष जहीरोद्दिन शेख कासम व पदाधिकारी.





