
निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- तालुका बहु विकास खादी ग्राम उद्योग सोसायटीच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवड झाली संचालक मंडळातून चेअरमन पदासाठी मुरलीधर उर्फ पिंटू महाजन यांची चेअरमन पदी व व्हाईस चेअरमन पदी ज्योती शिर तुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
यावेळी गणेश पाटील प्रकाश पाटील विश्वनाथ दहि भा ते बाळू शिरतुरे सिंधू शेलोडे विजय तायडे हे संचालक उपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून आयबी तडवी यांनी काम पाहिले त्यांना सहकार्य सचिव जिजाबराव चौधरी यांनी केले निवडणूक बिनविरोध होण्याकरता राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील व निंभोरा येथील ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते काशिनाथशेलोडे यांनी परिश्रम घेतले चेअरमन महाजन व व्हाईस चेअरमन सौ शिरतुरे यांचे निवडीबद्दल रावेर शहरात सर्वत्र अभिनंदन होत आहे