
झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
इंदापूर : इंडो एथलेटिक्स सायकल ग्रुप पुणे
आज पुणे ते पंढरपूर सायकल वारी वर इंडो एथलेटिक्स सायकल ग्रुप पुणे यांचे सुमारे अकराशे सभासद सायकल रॅली च्या माध्यमातून पंढरीच्या दर्शनासाठी निघाले होते. भिगवन सायकल क्लब च्या माध्यमातून सर्व सायकल स्वरांचे थंडगार गुलाब जल, केळी व थंड पाणी पाजून स्वागत करण्यात आले.
सातत्याने गेले सहा वर्षापासून सायकल च्या माध्यमातून पुण्याहून निघालेले सर्व सायकल स्वरांच्या माध्यमातून निसर्गाचे संवर्धन, वृक्ष वृद्धि, पर्यावरण संरक्षण असे संदेश या सायकल रॅलीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यावेळी पुणे येथून सायकलवर आलेले श्री जगताप साहेब ॲडिशनल कमिशनर जगताप साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी भिगवन सायकल क्लब सोबत वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.
या सायकल रॅलीमध्ये वय वर्षे दहा ते 75 पर्यंतचे लहान मुले, मुली, डॉक्टर, विविध पदांवर काम करणारे सरकारी अधिकारी अशा सर्व सामाजिक स्तरातून सर्वांनीच सहभाग घेतला होता. यामध्ये भिगवन चि कन्या प्रज्ञा बाबर (धुमाळ) हीनेही पुण्याहून सहभाग घेतला होता. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री इंदापूर तालुक्याचे आमदार श्री दत्तात्रेय भरणे यांनीही प्रवासादरम्यान अचानक थांबून काही काळ त्यांचे स्वागत व विचारपूस केली.
यावेळी भिगवन सायकल क्लबचे अध्यक्ष श्री रणजीत भोंगळे, सचिव अल्ताफ शेख, उपाध्यक्ष अर्जून तोडकर, योगेश चव्हाण, संजय चौधरी, रियाज शेख, संजय खाडे, डॉक्टर अमोल खानावरे, प्रवीण वाघ, संजय रायसोनी, संपत बंडगर, केशव भापकर, राहुल गुंदेचा, सचिन बोगावत औदुंबर हुलगे प्रदीप ताटे, कमलेश गांधी, संतोष सवाने Dr अमित खानावरे, KD भांडवलकर, दिनेश मारने, नामदेव कुदळे, Dr संकेत मोरे व ईतर सहकार्यांनी पुण्याहून सायकल वर निघालेल्या सर्व सायकलपट्टू चे स्वागत केले.





