प्रतिनिधी । एरंडोल:- एरंडोल दिनांक 3 जानेवारीपासून एरंडोल तालुक्यातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय येथे प्रांताधिकारी विनय गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील, डॉ. मुकेश चौधरी डॉ.तन्मय महाले रुग्ण कल्याण समितीचे सदस्य संजय चौधरी या मान्यवरांच्या हस्ते लसीकरणात सुरुवात करण्यात आली होती.
लसीकरणाला सुरुवात अत्यंत संथ गतीने सुरू झाली दिनांक 3 जानेवारी रोजी 81, दिनांक 4 जानेवारी रोजी 99, दिनांक 5 जानेवारी रोजी 179 तर 6 जानेवारी रोजी 308 किशोरवयीन विद्यार्थ्यांनी पहिली लस घेतली.दिनांक 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी फक्त एरंडोल ग्रामीण रुग्णालय या ठिकाणीच लसीकरण सुरू करण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख यांनी दिनांक 7 जानेवारीपासून तालुक्यातील तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये लसीकरणात सुरुवात करण्यात आली.
दिनांक 7 जानेवारी रोजी कासोदा येथील भारती विद्यामंदिर,तळई येथील माध्यमिक विद्यालय, व रिंगणगाव येथील रे ना पाटील विद्यालय येथे लसीकरणात सुरुवात करण्यात आली.तालुक्यात एकूण 36 शाळा असून या सर्व शाळांमध्ये इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी 2563 इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी 2271 इयत्ता आकरावी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी 1375 इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी1271 असे एकूण 7 हजार 580 शालेय विद्यार्थी आहेत व 1हजर 220 शाळा बाह्य बाहेरील युवक असे एकूण 8 हजार 800 किशोरवयीन मुलाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे दिनांक 7 जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एरंडोल तालुक्यात 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन विद्यार्थ्यांचे 14:50% लसीकरण झाले आहे.