झोका खेळतांना पडल्याने दीड वर्षे वय असलेल्या बालिकेचा मृत्यू ! दोन गंभीर जखमी

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-
तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे तीन चिमुकल्याच्या बहिणी झोका खेळत असताना झोकाच पडल्याने दीड वर्षीय बालिका हिचा मृत्यू झाला तर अन्य दोन लहान बहिणी हा गंभीर जखमी झाले आहेत या दोघा चिमुकल्यांना लहान बहिणींना जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे

या बाबत सविस्तर माहिती अशी की धनसिंग शीला पावरा हा आपल्या कुटुंबासह सावदे प्र.चा. येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून राहतो या ठिकाणी गावातील शेतकऱ्यांच्या शेती बटाईने करून आपल्या परिवाराच्या उदार निर्वाह करतो नेहमीप्रमाणे आज दि 18 जून रोजी सुद्धा तू सकाळपासून जयसिंग व त्याची पत्नी हे शेतामध्ये काम करण्यासाठी गेला होते घरी फक्त या तीन मुली व त्याच्या पत्नीची आई हे घरीच होते. त्याचे घर हे कच्च्या विटांचे होते व त्यावर लोखंडी पाईप टाकला होता

आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या लोखंडी पाईपाला साडीचा झोका बनवून त्या झोक्यामध्ये या तिन्ही मुली बसून झोका खेळत होत्या कच्चा विटांचे घर असल्यामुळे झोका अचानक खाली पडला व या तिन्ही मुलींच्या अंगावर या कच्च्या विटा पडल्या या घटनेमध्ये अर्चना धनसिंग पावरा हे दीड वर्षाची बालिकेच्या मृत्यू झाला व अन्य दोन साडे तीन वर्षे व पाच वर्षाच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाले आहे या दोघींवर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत अर्चना हिच्यावर सायंकाळी सावदे येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

टीम झुंजार