एरंडोल येथे शिवसेनेच्या वर्धापनदिन भगवा ध्वज फडकवून केला साजरा

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-
जात, गोत्र अन धर्म आमचा
शिवसेना.शिवसेना..शिवसेना..!
मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय आणि हक्क मिळवून देण्यात यशस्वी झालेली आपली शिवसेना आज ५६ वर्षांची झाली. त्याअनुषंगाने एरंडोल येथील शिवसेना कार्यालयात पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या शुभहस्ते शिवसेना वर्धापन दिनानिमित्त प्रतिमा पुजन करून भगवाध्वज फडकविण्यात आला.

यावेळी ग्रामीण रूग्णालय, एरंडोल येथे वृक्षारोपण देखिल करण्यात आले. याप्रसंगी तालुका समन्वयक समिती अध्यक्ष रमेश महाजन, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, मा.नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, मा.जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, मा.उपनगराध्यक्ष व बाजार समितीचे माजी सभापती शालिक गायकवाड, शहरप्रमुख कुणाल महाजन,माजी नगरसेविका आरती महाजन, प्रतिभा पाटील,

युवासेना शहरप्रमुख अतुल महाजन, मा.नगरसेवक सुभाष मराठे, विठ्ठल आंधळे, चिंतामण पाटील, सुनिल चौधरी, राजेंद्र महाजन, सुनिल मराठे, विक्की खोकरे, नितीन बिर्ला, परेश बिर्ला, सुनिल चौधरी,अमोल भावसार, कुणाल पाटील, मयुर महाजन, राज पाटील, कृष्णा ओतारी ,प्रसाद महाजन, राजेश महाजन ,रुक्षिकेश शिंपी, अजय महाजन ,जयेश महाजन ,स्वप्निल वाल्ङे ,प्रसंन्न परदेशी ,रवीद्र महाजन आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीम झुंजार