जळगाव :- जळगाव शिरसोली तालुक्यातील राजपाल नगरात महिलेचा गळफास घेतल्याने संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवार 20 जून रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास घडली. घातपातची शक्यता आसल्याने महिलेच्या पतीला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नबाबाई भावलाल भिल वय 35 असे मृत महिलेचे नाव आहे.
पाच मुली, एक मुलगा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसोली येथील राजपाल नगरात भाऊलाल पांडूरंग भिल हा पत्नी नवाबाई आणि सहा मुलांसह वास्तव्याला आहे. शेतीसह ट्रॅक्टरचालवून भाऊलाल भिल आपल्या परिवाराचा उदनिर्वाह करतो. तर पत्नी जैन व्हॅली इथे कामाला होती. भिल दाम्पत्य हे रविवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास गावात गेले. भाजीपाला घेऊन आल्यावर भाऊलाल भिल याने दारू घेतली होती. या दाम्पत्याला 5 मुली आणि 1 मुलगा आहे.
किचनमध्ये निपचित
भाऊलाल भिल याने दारू घेतली असल्याने तो घराबाहेरच्या घाटेवर झोपला. सकाळी उठून घराच पाहिले तर, त्याची पत्नी किचनमध्ये त्याला निपचित पडलेली दिसली. आपल्या पत्नीला असे “पाहून त्याने आराडाओरडा करुन शेजाऱ्यांना बोलवले असता त्यानंतर अवघ्या काही मिनिटात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलेने आत्महत्या केली की तिचा घाचपात झाला अशा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे.
पोलिसांना संशय
घटनेची माहिती मिळाताच सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, पीएसाय दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतूल वंजारी, रतीलाल पवार, जितेंद्र राठोड, शुध्दोधन ढवळे यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली.
गळ्यावर दिसले व्रण
महिलेच्या गळ्यावर काही व्रण दिसून आल्याने तिने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. परंतु तिचा मृतदेह किचनमध्ये निपचित पडल्याने तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. महिलेच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.