जळगाव :- राज्यसभा निवडणूक व विधानपरिषद निवडणूकमध्ये लागोपाठ दोन वेळा धोबीपछाड मिळालेल्या महाविकास आघाडीला अजून मोठा एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे प्रती मुख्यमंत्री म्हटले जाणारे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या २५ आमदारांसह नॉट रिचेबल झाले आहेत. यात जळगावच्या पाचोराचे आमदार किशोर पाटील आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे देखाली नॉट रिचेबल आहेत. यामुळे याचबरोबर याबाबद पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात नकार दिला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता आता अजून वाढली असून आता शिवसेना पुनः एकदा फुटते आणि सरकार कोसळते की काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
गेल्या वर्षभरापासून नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहेत. त्यांच्या गटातील अनेक आमदार देखील महाविकासआघाडीवर नाराज आहेत.राज्यसभेनंतर कालच विधान परिषदेत देखील भाजपने महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. आपल्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी शिवसेनेने आज बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, काल सायंकाळपासून नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे त्यांच्या गटातील आमदार नॉटरिचेबल असल्याचे म्हटले जात आहे. याची खबर मातोश्रीवर पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते मात्र या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदेसह आमदार नॉटरिचेबल असल्यामुळे त्या ठिकाणी आली नाहीत यामुळे आता ते कोणचा टोकाचं पाऊल उचलतात का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ना.एकनाथ शिंदे समर्थक समजले जाणारे जळगावातील दोन आमदार देखील नॉट रीचेबल म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांचा एक मोठा गट असून त्यांच्या मुळेच शिवसेनाचा पाया मजबूत असल्याचे नेहमी म्हटले जाते. काल पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची अतिरिक्त मते मिळवत भाजपने आपला इरादा काय आहे ते स्पष्ट केले होते.