
झुंजार । प्रतिनिधी
पारोळा – तालुक्यातील वाघरे येथे काल भाऊबंदकी मध्ये गेल्या काही दिवसापासून किरकोळ शेतीची किंवा इतर वाद सुरू होता . दिनांक 19 रोजी सायंकाळी गाडीच्या कट मारण्याच्या कारणावरून वाद झाला यात लाठ्याकाठ्या च्या सह कोयते काढून सपासप वार करीत तब्बल 15 जण जखमी झाले म्हणून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यात कोयत्याने वार करणारे चार जणं गंभीर स्वरुपाच्या जखमी झाले असल्याची घटना घडली आहे
तालुक्यातील वाघरे येथे भाऊबंदकीमध्ये शेतीच्या व इतर कारणावरून गावात किरकोळ स्वरूपाची भांडणे होत होती परंतु दिनांक 19 रोजी किरकोळ स्वरूपाच्या भांडणाला वेगळे वळण त्यात नातेगोते सर्व बाजूला ठेवत एकमेकांवर धारदार शस्त्राने वार करत सुटले त्यात चार जण गंभीर जखमी झाले आहे जणू काही ही मंडळी एकमेकांचा जीव घेण्यावर उठालेले होते कि काय असं वाटत होतं . गावातील व रुग्णालयातील परिस्थिती ज्या क्षणी गंभीर होती धावा धावी सुरू होती रुग्णालयाच्या परिसरात यांच्या वादातून अक्षरशाह रक्ताचा सडा पसरला होता घटनास्थळी पोलीसाचा फौज फाटा होता म्हणून वाद लवकर आटोक्यात आला अन्यथा या ठिकाणी वेगळे चित्र बघायला मिळाले असतं असं प्रत्यक्ष दर्शनी नागरीकांनी सांगितलं .
कृष्णा भिकारी पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली की दिनांक 19 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास माझा पुतण्या महेंद्र नाना पाटील हा त्याच्या लहान मुलांना गावात फिरवत असताना माझ्या घराशेजारी राहत असलेले मल्हारी विक्रम पाटील यांचा मुलगा मनोज मल्हारी पाटील याने त्याच्या ताब्यातील असलेल्या मोटरसायकलने त्या मुलाला कट मारला याबाबत आम्ही त्याच्याकडे जाब विचारण्यास गेलो असता त्यांनी माझा भाऊ भाऊसाहेब यास कुठलेही कारण न सांगता मारहाण करण्यास सुरुवात केली याबाबत आरडाओरड ऐकू आल्याने आम्ही घटनास्थळी धावलो असता त्यांनी सुदाम व महेंद्र यांना कोयत्याने मानेवर जोरात वार करत गंभीर जखमी केले होते यावेळी गावातील लोकांनी आम्हाला विचारार्थ रुग्णालयात पाठवले असता तेथे उपचार सुरू असताना आम्ही घटनास्थळी होतो
त्यावेळी मनोज मल्हारी पाटील व रावसाहेब मगन पाटील यांनी हातात कोयते घेऊन आम्हाला मारण्याच्या उद्देशाने रुग्णालयात धावत आले यावेळी त्यांनी फिर्यादी व त्यांचा मुलगा योगेश यास कोणत्या ने मानेवर वांगावर वार करत गंभीर स्वरूपाचे जखमी केले घटनास्थळी पोलिस असल्याने मोठा अनर्थ टळला म्हणून याबाबत कृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसात मनोज मल्हारी पाटील, अनिल मल्हारी पाटील, सुधाम रमेश पाटील, सुनील रमेश पाटील, रोशन पुंडलिक पाटील, पुडलिक विक्रम पाटील, रमेश विक्रम पाटील, मल्हारी विक्रम पाटील, रावसाहेब मगन पाटील यांच्यावर भा द वि कलम 307,324,323,143,147,148,149,504,506 आर्म ऍक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहे
जखमी झालेल्याची नांवे –
मल्हारी विक्रम पाटील, रमेश विक्रम पाटील, अनिल मल्हारी पाटील, पुंडलिक विक्रम पाटील, सुदाम रमेश पाटील, रोशन पुंडलिक पाटील, सुनील रमेश पाटील, नानू भिकारी पाटील, भाऊसाहेब भिकारी पाटील, महादेव नानू पाटील, योगेश कृष्णा पाटील, दीपक महादू पाटील, आधार भिकारी पाटील, महादू विक्रम पाटील, गजेंद्र नाना पाटील,
दरम्यान जखमीना धुळे येथे पुढील उपचारासाठी शिवसेनेच्या रुग्णवाहिकेतुन हलविण्यात आले .