
पिंप्री खु येथील आदर्श प्राथमिक , माध्यमिक शाळेत योग दिवस साजरा करण्यात आला.
धरणगाव :- या वेळी विद्यार्थ्यांना विविध आसने व योगा बाबतीत एस के शिंदे यांनी माहिती दिली . तर प्रस्ताविक आर एस पातील यांनी केले. योगासने व आरोग्यासाठी सकाळच्या व्यायाम महत्त्वाचा।असुन त्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे . आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस असल्याने शाळेच्या प्रांगणात योगासन साठी व्यवस्था आयोजित करण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी मुख्याध्यापिका सॊ व्ही एम चौधरी .आर आर पावरा सर , शरीफ पटेल सर , जितेंद्र पाटील सर सचिन पाटील सर ,मनिषा पाटील मॅडम लिपिक सौरभ देसले शिपाई सुदर्शन चव्हाण , तसेच प्राथमिक माध्यमिक शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.





