बारावीत पाहिले आलेले तेजस व सुजता या भाऊ बहीण या दोघांचा सत्कार

Spread the love

बालाजी शैक्षणिक संकुलात गुणगौरव सोहळा संपन्न
झुंजार । प्रतिनिधी

पारोळा – येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित डॉ.व्ही. एम. जैन माध्यमिक व आप्पासाहेब यु.एच.करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय व सौ एम.यु. करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल पारोळा या शैक्षणिक संकुलात मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच जिल्हा परिषद जळगावचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु. एच. करोडपती तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉक्टर सचिन बडगुजर, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, शालेय पोषण आहार अधीक्षक चंद्रकांत चौधरी , साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ चोपडाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव विजय करोडपती, संचालक विनायक पाटील ,बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळाचे संचालक मंगला करोडपती ,सुनील बडगुजर ,आशिष बडगुजर, डॉ. चेतन बडगुजर ,प्रा. संजय बडगुजर,

पारोळा तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष विनोद माने,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील, प्राचार्य विजय बडगुजर,सौ.एम .यु.करोडपती इंग्लिश मेडियमच्या प्राचार्य स्वाती बलखंडे आदी उपस्थित होते. डॉ.व्ही एम जैन उच्च माध्यमिक विद्यालय चे विद्यार्थी तथा पत्रकार विश्वास चौधरी यांचा चिं तेजस विश्वास चौधरी 82.67% सुजाता प्रदीप चौधरी हे सयुक्त रित्या प्रथम आलेले भाऊ बहीण व इयत्ता दहावीत 92 टक्के मिळविणारा मुकुल यशवंत चौधरी यांचा सत्कार शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांच्या हस्ते पालकांनी स्वीकारला.

तसेच याप्रसंगी पारोळा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी विद्यालयाच्या बाबतीत गौरवोद्गार काढले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या संस्थेचे सचिव डॉ.सचिन बडगुजर यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाचे श्रेय पालक व शिक्षकांना दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष यु एच करोडपती यांनी हिरा चमकण्यासाठी त्याला पैलू पाडायचे काम करावे लागते तसेच विद्यार्थ्यांचे गुण बाहेर काढ आणण्याचे काम हे शिक्षक करतात असे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन
दीपक भावसार व साळुंखे मॅडम यांनी केले.

टीम झुंजार